भाजप
भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.
मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही… अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, पुण्यात काय घडलं?
Abhimanyu Pawar and Medha Kulkarni : पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युपीएससी, एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरुन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jun 26, 2026
- 3:00 pm
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी… कारण अत्यंत चकित करणार
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात आज भाजपमधील नाराजीचे नाट्य पाहायला मिळाले. भाजप नेत्या मेधा कुलकर्णी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. मात्र, कार्यक्रमातील पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेवरून त्या नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Jun 26, 2026
- 2:30 pm
Maharashtra News LIVE : पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत, एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांना दिली समज
Maharashtra News LIVE : राज्यात मान्सूनने पाय पसरले आहेत. काय जिल्हे आणि परिसर वगळता मान्सूनने राज्य व्यापले आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी बि-बियाणांच्या दुकानावर गर्दी सुरू केली आहे. येत्या चार पाच दिवसात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 26, 2026
- 2:11 pm
खासदारांनंतर आता आमदार फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत मोठं विधान
Shivsena UBT : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आता आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटू शकतात असं विधान केलं आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jun 25, 2026
- 2:53 pm
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई…ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका सूचक विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. "ऑपरेशन यशस्वी आणि बॉडीही सुदृढ" असे वक्तव्य करत फडणवीस यांनी प्रथमच "ऑपरेशन टायगर" संदर्भात अप्रत्यक्ष भाष्य केल्याचे मानले जात आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jun 25, 2026
- 10:13 am
Operation Tiger: त्या खासदारांना धनुष्यबाण नव्हे कमळ घ्यायचे होते हाती? मग पडद्या आड काय घडलं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत… मोठी अपडेट आली समोर
Operation Tiger Devendra Fadnavis: ऑपरेशन टायगरमधील एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या ऑपरेशनचे इतर पदर आता उलगडायला लागले आहे. बंडखोरांना धनुष्यबाण नव्हे तर कमळ हाती घ्यायचे होते अशी माहिती समोर येत आहे. उद्धव सेनेचा सहावा खासदार गळाला लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई मोलाची ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे ती इनसाईड स्टोरी?
- nivruti babar
- Updated on: Jun 25, 2026
- 10:05 am
Sanjay Raut: रिक्षावाल्यांना मारतो, तसं नार्वेकरांना मारायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या मराठीवरून संजय राऊतांचा खरमरीत टोला
Sanjay Raut on Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आशा भोसले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव वाचताना चुका केल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 24, 2026
- 10:48 am
सत्तेच्या सारीपाटावर भाजपची मोठी चाल… NDA मध्ये समीकरण बदलणार? नितीश-चंद्रबाबूचा पत्ता साफ! शिंदेंची वाढली बार्गेनिग पॉवर? कोण किंगमेकर ठरणार?
BJP-Shiv Sena- NDA: देशातील चळवळीची केंद्रबिंदु असलेल्या दोन राज्यात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपने मोठा खेला केला. ममता दीदींची तृणमूल काँग्रेस आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली. या राजकीय भूकंपामुळे NDA मध्ये समीकरणं बदलली आहेत. आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंच्या किंगमेकर भूमिकेलाच सुरूंग लागला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 24, 2026
- 9:49 am
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती…; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
राज्यात सध्या सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना, आणखी काही आमदार आणि खासदार पक्षांतर करू शकतात, अशा चर्चा रंगल्या आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jun 23, 2026
- 12:32 pm
बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…
Union Minister Resign: केंद्रीय मंत्रिमंडळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील बड्या नेत्याने राजिनामा दिला आहे. त्यांचा हा तडकाफडकी राजिनामा राष्ट्रपतींनी तात्काळ मंजूर केला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Jun 23, 2026
- 11:59 am
विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार
Legislative Council BJP Strength: वरिष्ठ सभागृहात भाजपची ताकद वाढली आहे. 73 पैकी 35 आमदार एकट्या बीजेपीचे आहे. तर बहुमताच्या काठावर असणाऱ्या भाजपचे संख्याबळ त्या एका खेळीमुळे वाढणार आहे. भाजपला आता मित्र पक्षाचीही गरज भासणार नाही.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 23, 2026
- 9:31 am
BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे?
BJP : सध्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील खासदार फुटले आहेत. कुठल्याही मोठ्या निवडणुका नसताना अचानक घडणाऱ्या या घटनाक्रमामुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 2029 साठी भाजपचं यामागे काय प्लानिंग आहे? जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तर.
- Dinananth Parab
- Updated on: Jun 23, 2026
- 9:00 am